गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील सीमेवर असलेल्या नवापूर शहराजवळील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाकीपाडा येथील पुलावर मोठे भगदाड पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भगदाडामुळे महामार्गावरील वाहतूकीचा एक मार्ग बंद करण्यात आलाअसून, कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही घटना एका मोठ्या अपघाताचे निमित्त ठरू शकली असती.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून पुलावर किरकोळ तडे जाणवू लागले होते. मात्र संबंधित यंत्रणांकडून वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे अखेर आज सकाळी पुलावर सुमारे सुमारे तीन फूट व्यासाचे भगदाड पडले. वाहनचालकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
या प्रकरणामुळे महामार्गाच्या कामातील निष्कृष्टपणा समोर आला असून, ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करोडो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या
Tags:
सामाजिक