येथील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने उत्तर महाराष्ट्र करसल्लागार प्रॅक्टिस असोसिएशनचे अध्यक्ष व कोपरगांव येथील नामांकित करसल्लागार श्री नितिन डोंगरे यांना
"MTPA चा बेस्ट फ्रेंड अँवार्ड" प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा पुरस्कार पुणे येथील संस्थेचे अध्यक्ष ऍड.श्री प्रसाद देशपांडे यांचे हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला.
आपल्या मनोगत व्यक्त करताना श्री नितीन डोंगरे म्हणाले, की"हा पुरस्कार केवळ व्यक्तिगत स्वरूपाचा नसून,यामुळे उत्तर महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा हा एक प्रकारे मी गौरव समजतो. करसल्लागार सदस्यांच्या एकतेचे, प्रामाणिक कार्याचे आणि परस्पर सहकार्याचे हे प्रतीक आहे" असे मी मानतो त्यामुळे हा सन्मान केवळ माझा नसुन माझ्या सर्व सहकार्याचा आहे.
याच कार्यक्रमात नाशिक येथील करसल्लागार श्री अनिल चव्हाण यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल "कोहिनूर पुरस्काराने" गौरविण्यात आले, तर श्री नयन निर्हाळी यांना "सुपरस्टार "पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारामुळे व सन्मानांमुळे नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची महाराष्ट्र पातळीवरील ओळख अधिक भक्कम झाली आहे. या गौरवामुळे संस्थेतील सदस्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून, येणाऱ्या काळात अधिक संघटित आणि गतिमान कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
करसल्लागार नितिन डोंगरे, करसल्लागार अनिल चव्हाण व करसल्लागार नयन निर्हाळि यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्राप्त होत आहे.
Tags:
यश/ निवड