महाराष्ट्र शासनाच्या निर्देशनानुसार शाळा प्रवेश राज्यभर साजरा करण्याचे आदेश सर्व लोकप्रतिनिधींना दिलेले आहेत, त्यानुसार आज शाळेचा पहिला दिवस या दिनानिमित्त कोकण विभाग शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा , खोणी कल्याण येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले .तसेच विद्यार्थ्यांना स्वागत करत असताना गुलाब पुष्प देऊन पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळाची पुस्तके व गणवेश देऊन मुलांना प्रोत्साहित केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ. कुंदा पंडित , केंद्रप्रमुख चव्हाण , गटसाधन प्रमुख लोखंडे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.देशमुख तसेच शाळेचे शिक्षक व पालक उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक