नंदनगरीत आषाढी महिन्यातील कृष्णा पक्षातील एकादशीला श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अनिता शिरीष चौधरी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष शहराचे श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ नारायणशेठ शिंपी होते. प्रतिमा व पालखीचे पूजन सौ अनिता शिरीष चौधरी, यांनी केले. महीला जिल्हा अध्यक्ष सरिता भामरे, गोणाई महिला मंडळ अध्यक्ष संगीता जाधव, अध्यक्ष सोमनाथ शिंपी व उपध्याक्ष शैलेश शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदीप शिंपी यांनी केले.
श्री. संत शिरोमणी नामदेव महाराजांचे प्रतिमेचे पूजन करून हरीनाम गजर करत नाचत गात, तेली वाडी येथून गणपती मंदिर मार्ग कुकरमुडे कर महाराज याचे विठ्ठल मंदिर येथे महाआरती भेट, भजन किर्तन करत समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद वाटप करण्यासाठी श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ शिंपी, उपाध्यक्ष शैलेश शिंपी, सचिव प्रदीप शिंपी, सदस्य गजेंद्र शिंपी, अनिल शिंपी, बिजय देवरे, दिनेश पवार, मोहन भामरे, विवेकानंद चव्हाण, प्रशांत बिरारी, वैभव करवंदकर, देविदास कापडणे, सुनील पवार, राजाराम सोनवणे, हितेश अहिरे, प्रवीण सोनवणे, आनंद सोनवणे, महेन्द्र सोनवणे, मुकेश सोनवणे विपिन चव्हाण, लोटन बाविस्कर, हिरालाल शिंपी, रोहित शिंपी, आशिष कापडणे, महेश करवंदकर, प्रसाद सोमनाथ शिंपी यांच्यासह असंख्य समाजातील युवक यांनी महाप्रसादाचे वाटप केले.
Tags:
धार्मिक