सुरत येथे संतशिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

सुरत सत्यप्रकाश न्युज 
    येथील पावन भुमीत श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत-उधना  समाज भुवन मध्ये    आपले आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज  यांचा 675 वा समाधी सोहळा भव्यदिव्य साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी उपस्थित श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज सुरत येथील विद्यमान अध्यक्ष  प्रकाशशेठ ताराचंद्रशेठ मेटकर व सर्व कार्यकारी मंडळ व नवयुवक मंडळ तसेच महीला मंडळ व स्थानिक शिंपी समाज माऊली याच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला  प्रथम संत शिरोमणी नामदेव महाराज व श्री हरी विठ्ठल रखुमाई यांची पंचामृताने स्नान करण्यात आले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली व महाआरती करण्यात आली व प्रतिमेचे फुलहार करून पूजन अध्यक्ष यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले ,कार्यक्रम च्या सुरुवातीला वर्षभरात जे दिवंगत होवून गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली  देण्यात आली. 
  कार्यक्रमाचे अध्यक्ष,   प्रकाशशेठ ताराचंद्रशेठ मेटकर यांच्या उपस्थितीत सुरत येथील कार्यकारी मंडळ व नवयुवक मंडळाचे अध्यक्ष, तसेच महीला मंडळाच्या अध्यक्षा यांचे विद्यमान अध्यक्ष श्री प्रकाशशेठ ताराचंद्रशेठ मेटकर यांच्या हस्ते समाज भूषण ची शाल,,, ट्रॉफी,,,, आणि श्री हरी विठ्ठल व नामदेव महाराज यांचा स्कार्फ देऊन सत्कार करण्यात आले.   नवयुवक मंडळाचे अध्यक्ष  जितेन्द्रशेठ छबुलालशेठ बागुल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान अध्यक्ष व कार्यकारी मंडळाचे आवक-जावक चा हिसोब समाज समोर मांडला ते पाहून नवयुवक मंडळानीं सर्व कार्यकारी मंडळाचे गुलाबाचे फुल,शाल,टोपी देवून सत्कार करण्यात आला,सल्लागार , चंद्रकांतशेठ ईसइ यांनी समाजाबद्दल आपल्या मधुर वाणीत विचार मांडले व माजी अध्यक्ष  प्रकाशशेठ सोनवणे यांनी समाजातील  मुलामुलींच्या लग्न विषयावर  मत व्यक्त केले  एकनाथशेठ दगाशेठ सोनवणे यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या चरित्रावर व्याख्यानं केले सुरत शहर भावी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ,चंदाताई प्रकाशशेठ सोनवणे यांची महीला मंडळाच्या सर्वानुमते नियुक्ती करण्यात आले,व त्यांचे      स्वागत करण्यात आले तसेच शेवटी सांगता विद्यमान अध्यक्ष  प्रकाशशेठ ताराचंद्रशेठ मेटकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  नरेंद्रशेठ यशवंतरावशेठ खैरनार यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले खूप छान प्रकारे शेर, शायरी बोलत  कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे समापन राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post