मुलांमध्ये कोणत्याही स्वरूपात तुलना न करता लेकरांचे कौतुक आणि प्रेरणा द्या - दत्तात्रय जाधव

      नवापूर सत्यप्रकाश न्युज 
कधीही आयुष्यात मुलांसंदर्भात कोणत्याही स्वरूपाची तुलना न करता विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचे कौतुक करा आणि त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी प्रेरणा द्या असे प्रतिपादन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी केले.
   जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर संचलित साई संजीवनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगाव या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या आयोजनात इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी इयत्ता चौथी इयत्ता सहावी आणि इयत्ता सातवी या इत्याचे विद्यार्थी परीक्षेला बसवले जातात. जानेवारी 2025 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल लागला असून केंद्रस्तरावर गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा तहसील कार्यालय नवापूर येथे नुकता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवापूर तालुक्याचे तहसीलदार दत्तात्रय जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून नवापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते,बीएड महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे हे होते. या कार्यक्रमात उपक्रमशील पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीमती लीना मोन्सा गावित (सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमलान तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार.)श्री नितीनकुमार अरविंदभाई राणा, (सहाय्यक शिक्षक, श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर जिल्हा नंदुरबार.) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
  गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दुसरी 
पाटील राधेय चंद्रशेखर, आदर्श प्राथमिक शाळा नवापूर(केंद्रात प्रथम),शिंदे अस्मिता बाजीराव शालिनी, जयंत नटावतकर प्राथमिक शाळा नंदुरबार (केंद्रात द्वितीय)पाटील अंश अतुल सार्वजनिक प्राथमिक शाळा नवापूर ( केंद्रात तृतीय),पाटील अरुज सुरेश, सार्वजनिक प्राथमिक शाळा नवापूर (केंद्रात तृतीय).इयत्ता तिसरी या वर्गात सोनार रिशिका स्वप्नील, के जी जे नटावतकर प्राथमिक शाळा नंदुरबार (केंद्रात प्रथम) वसावे पुनम अविनाश, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमलान तालुका नवापूर (केंद्रात द्वितीय).इयत्ता चौथी या वर्गात वसावी आचल आनंद,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवापूर जिल्हा नंदुरबार (केंद्रात प्रथम), गावित हर्षाली नेहरू,आदर्श प्राथमिक शाळा नवापूर (केंद्रात द्वितीय), निषाद अंशिका रामाश्रय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमलान जिल्हा नंदुरबार (केंद्रात तृतीय).इयत्ता सहावी या वर्गात एकलारे विवेक संतोष, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय श्रावणी नंदुरबार 2 (केंद्रात प्रथम), साळुंखे अनुष्का प्रवीण, श्रीमती एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर (केंद्रात द्वितीय) इयत्ता सातवी या वर्गात पाटील नक्षत्रा चंद्रशेखर, वनिता विद्यालय नवापूर (केंद्रात प्रथम).ठोंबरे आदित्य बालकिसन, श्री शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नवापूर (केंद्रात प्रथम).
  एमटीएस स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि उल्लेखनीय कामगिरी बजावून मिरीट मध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
  या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बालकिसन ठोंबरे सर आणि सुरेश पाटील सर यांनी परीक्षा संदर्भात मनोगत व्यक्त केले.
  या कार्यक्रमाचे आयोजक तसेच जोशाबा सरकारी युवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ.नितीनकुमार माळी यांनी एम.टी.एस या परीक्षेचे नंदुरबार जिल्ह्याचे केंद्र संयोजक म्हणून शंभर टक्के पारदर्शक परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जात असल्याची माहिती प्रास्ताविकातून पालकांसमोर मांडली.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गावित, प्रास्ताविक जोशाबा सरकारी युवा मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ. नितीनकुमार माळी, तर आभार संजीवनी पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमटीएस या परीक्षेचे संचालक योगेश राणे, एमटीएस या परीक्षेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष महाजन, जोशाबा सरकार युवा मंडळाच्या सचिव नीलिमा माळी तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ, प्रशांत पाडवी, ऋषिकेश पाडवी,निशिकांत गावित,रोहन गावित, नितीक्षा वसावे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

Previous Post Next Post