संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा मंदिर नंदुरबार येथे भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन

      नंदुरबार सत्यप्रकाश न्यूज 
   येथील  संत सावता भजनी मंडळ नंदुरबार  संत सावता महाराज मंदिर समिती माळीवाडा नंदुरबार समस्त माळी समाज नंदुरबार यांच्यातर्फे सालावादाप्रमाणे यंदाच्या वर्षी ही संत शिरोमणी संत श्री सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत सावता महाराज मंदिर माळीवाडा परिसर नंदुरबार येथे भागवत कथा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध कीर्तनकार, भागवतकार ह भ प सौ चंदाताई सांगळे धुळेकर यांची सु श्राव्य भागवत कथा दिनांक 17 जुलै ते 23 जुलै अखेर आयोजित करण्यात आलेली आहे . 17 जुलै रोजी दुपारी दोन वाजता बोडरे गल्ली माळीवाडा परिसर नंदुरबार येथून भागवत ग्रंथाचे  विधिवत पूजन करून  टाळ मृदुंगाच्या गजरात  मिरवणूक संत सावता महाराज मंदिरात येईल व भागवत तसेच प्रारंभ होईल पहाटे 5 ते 6 प्रभात फेरी 6 ते 7 काकड आरती दुपारी 2 ते 5 भागवत कथा व महाआरती सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ रात्री आठ 8 ते 10 हरी कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम असून या भागवत कथेस व कीर्तन सप्ताहास शहरातील व परिसरातील भाविक भक्तांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.
 दिनांक 17 जुलै रोजी ह भ प शुभम महाराज मंदाने 18 जुलै  ह भ प सौ कामिनीताई ज्ञानेश्वर माळी,19 जुलै  ह भ प ज्ञानेश्वर माळी महाराज वरझडी कर,20जुलै  ह भ प रामचंद्र महाराज मालपुर कर 21 जुलै ह भ प स्नेहल ताई सामनेर, 22 जुलै ह भ प पंकज महाराज एकता सर दिनांक 23 जुलै रोजी सकाळी ह भ प राम महाराज भोणेकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने भागवत कथा व संकीर्तन  सप्ताहाची सांगता होईल.

Post a Comment

Previous Post Next Post