आरोग्य धनसंपदा ग्रुप,
. आजीबाईचा बटवा
.सौ. सुजाता जोशी. वय - ३८ वर्ष. मगनलाल चिक्की मागे. लोणावळा.---- ! विषय:- केस का गळतात ? केस गळू नये ? यासाठी काय करावे ?
खरं म्हणजे माझे लग्न फार उशिरा झाले ? एक कन्यारत्न आहे . मी खाजगी कंपनीमध्ये क्लीरिकल जॉब करते. सर्व आनंदी आनंद आहे. पण रोज माझ्या डोक्यावरील केसांची गळती भरपूर होते. मी फार विचार करते. बरेच डॉक्टर्स ब्युटी पार्लर मध्ये जाऊन त्यात जाहिरातीची तेल. शाम्पू वापरले. पण विशेष काही फरक पडला नाही. मी काय करावे ? आपण नेहमी वेगवेगळ्या आरोग्य या विषयावरती लिहितात. मी आज चार वर्षापासून आपल्या आरोग्य धनसंपदा ग्रुप मध्ये मेंबर असून आजीबाईचा बटवा न चुकता चहा घेता घेता वाजत असते... आणि माझ्या ऑफिस मधील सर्व स्टॉपला आणि नातेवाईकांना न चुकता पाठवते.
डोक्याचे केस गळणे
डोक्यावरील केस गळणे . केसाची गळती सुरू होणे. त्याला हेअर फॉल असे म्हणतात. त्यात कधी कमी वयात किंवा अकाली केस पांढरे होणे. कधी केस रफ होणे. एखाद्या वेळी केसांमध्ये कोंडा होणे. रात्रीच्या वेळेस डोक्याला सतत खाज येणे . त्यावेळी केसांची गळती नेहमी होते. कधी कधी केसांमध्ये घाम जास्त आल्यामुळे सतत बुरशीजन्य कोंडा होईल वचका येत असते. केसांमध्ये ज्यांना कोरडे केस आवडतात त्यांची केस मुळात थेट सरळ असतात आणि ज्यांना प्रेस केस आवडतात त्यांचे केस कोरडे असतात. त्यामुळे हल्ली मुलं मुली तरुण-तरुणी आपल्या आवडीनुसार केसांचे स्ट्रक्चर बदलतात त्याला रिबाईडिग . पर्मिग . क्रिम्पिग.कर्लिंग . या सगळ्या हिट आणि केमिकल युक्त ट्रीटमेंट हे सर्व केले जातात आपल्या आवडीनुसार सहा ते आठ महिन्यापर्यंत केस पाहिजे तसे ठेवता येतात . अर्थात नवीन येणारे केस नैसर्गिक रचनेप्रमाणे येऊ शकतात . तो भाग वेगळा मग ही प्रोसेस वारंवार केले जाते . आणि कळत नकळत आपण केसांचे नुकसान करत जातो . फेरफॉल होणे मागे एक प्रमुख कारण आहे . याशिवाय अन्य काही कारणामुळे केस गळतात . आणि पुढे जाऊन हेअर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ येऊ शकते . हे टाळण्यासाठी काय काळजी घेता येईल ? त्याबद्दल माहिती आपण घेऊ या ?
केस गळण्याचे काही कारणे
केस गळणे म्हणजे हेअर लॉस हि एक वयाप्रमाणे निर्माण होणारे सामान्य समस्या आहे. त्यातील काही महत्त्वाची कारणे : --
१) अनुवंशिकता : -- पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही अनुवंशिकतेनुसार वयाप्रमाणे केस गळू शकतात. जर आपल्या आई वडील कमी वयात हेअर लॉस या आजाराने त्रस्त असतील किंवा डोक्यावर टक्कल पडले असेल. तर येणाऱ्या नवीन पिढीला त्याच वयाप्रमाणे डोक्यावरील केस हळूहळू कमी होऊन गळु शकतात. याला अनुवंशिकता असे म्हणतात.
२) शरीरातील निर्माण होणार हार्मोनल बदल : -
वयानुसार मुलगा अथवा मुलगी जसे मोठे होतात त्याच वेळी त्यांच्या शहरात विशिष्ट प्रकारच्या ग्रंथींची वाढ होते. म्हणजे शरीरात हार्मोनल बदल होतात. किंवा गरोदर पणात नाहीतर बाळंतपणात अथवा रुजू निवृत्तीनंतर आणि थायरॉईड ग्लंड्स च्या. असंतुलनामुळे आपल्या शरीरात डोक्यावरील केस गळू शकतात.
३) जीवनसत्त्वाची कमतरता:-
आपल्या नेहमीच्या आहारात जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास म्हणजे जेवणातील विटामिन डी. लोह.
बी १२ . विटामिन सी बायोटिन कमी गेले किंवा पोषण तत्त्वाची कमतरता झाली तर डोक्यावरील केस गळतात. पौष्टिक आहार असणे महत्त्वाचे आहे कारण सुदृढ शरीरासाठी हवा अन्न पाणी हे पौष्टिक आणि या या या
४) सततचा ताण तणाव : -- जीवनात नेहमी मानसिक आणि भावनिक . विचार . संताप . टेन्शन .असमाधान . संशयीवृत्ती . वैचारिकता . नकारात्मक भावना..जास्त असल्यास डोक्यावरील केस गळतात.
५) काही असदृश्य आजार : -- नेहमी होणारा त्वचा विकार उदाहरणार्थ एक्झिमा सोरायसिस किंवा येलोपेशिया हे आजार नेहमी आपणास कळत नकळत होत असतात. अशावेळी सततची खाज आल्यामुळे केस गळू शकतात.
६) इतर काही कारणे : -- केस विचारताना त्यांना जास्त कडक. ताणने किंवा डोक्याला कोणीतरी नाहीतर वेणी तंग बांधल्याने केस आपोआप गळतात. आपण एखाद्या कंपनीत ...ऑफिसमध्ये काम करताना अति उष्णता तेथे असल्यास केस गळती आपोआप होते.
७) जीवनात नेहमी अति धूम्रपान. मद्यपान. खराब जीवनशैली. खाण्यात तमोगुणी पदार्थ. मसाला मिरची जास्त खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढून केस गळतीचे प्रमाण वाढते.
हल्ली जंक फूड चे प्रमाण जास्त वाढले आहे. झोपायच्या वेळा अनियमित झालेले आहेत.
केस पुन्हा वाढू शकतात का
हो ? वाढू शकतात !! -----सुरुवातीपासून याला साधे सरळ घरगुती उपाय महत्त्वाचे असतात. कारण अति विचार सतत असमान मनातील ताण तणाव कमी करून सकारात्मक जीवन - आनंदी वृत्ती - मनातील महत्त्वकांक्षा - सुंदर बोलणे सुंदर हसणे - आपली रोजची जीवनशैली सतत पॉझिटिव्ह ठेवणे म्हणजेच आहार सत्वगुणी त्यात पाणी भरपूर प्यावे. दैनंदिन काम सुव्यवस्थेत करावे. आपला कामातील कॉन्फिडन्स वाढवावा. रोज नवनवीन शिकण्याची वृत्ती ठेवा. आपण करीत असलेले कार्याची तुलना इतरांशी करू नका. आपले घर नेहमी प्रफुल्लित आनंदित ठेवा. पचनसंस्थेमध्ये सर्व प्रकारचे विटामिन येतील याप्रमाणे सत्वगुणी पदार्थ घ्यावेत. सतत रोजच चिडचिडपणा करू नका त्यामुळे आपलेच विचार आपल्याला शंका निर्माण करतात त्यामुळे आपोआप ताण-तणाव वाढतो आणि शारीरिक असे आजार निर्माण होतात.
रोज रोज अंघोळीच्या वेळी केस ओले करू नका किंवा रोज रोज शाम्पू अथवा साबण लावणे केसांना चुकीचे आहे. केस ओले झाल्यास स्वच्छ टॉवेलने पुसावे. हळूच नारियल तेल साध्या हाताने पूर्ण केसांच्या मुळापर्यंत लावावे.
केशरचना साधी सरळ ठेवा. जास्त केसांना ताणू नका.
केसांना शक्यतो नेहमी नेहमी काळी मेहंदी अथवा ब्लॅक ब्राऊन हेअर ड्राय अथवा शाम्पू म्हणजे कंडिशनर वापरू नका. आशा केमिकल मुळे केस गळतात. आणि स्ट्रक्चर बदलते व आपोआप हेअर लॉस होतो. असे हे चक्र कमी वयात मुलं मुली जास्त प्रमाणात करतात . त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट ची वेळ लवकर येते . हे टाळण्यासाठी पौष्टिक आहार आणि हेल्दी लाईफ स्टाईल करणे . फार गरजेचे आहे. नैसर्गिक केस हे कधीही चांगले दिसतात. आपण जाहिरातीनुसार कोणताही रंग किंवा केमिकल लावून केस गळण्याचे उपाय शोधतो. हे सर्व बंद करावे. थोडक्यात हा आजार नाही किंवा विकार नाही पण याच्यातील कारणे हे आपण निर्माण करतो . त्यामुळे भर तारुण्यात कधी कधी हेयर लॉस होऊन आपल्याला डोक्याच्या मध्यभागी टक्कल पडते.
व्यक्तिमत्व विकास यात प्रथमतः डोक्यावरील केस आणि भांगरचना यावरून तुमचं कर्तृत्व आणि स्वभाव कळतो. त्यानंतर चेहऱ्यावरील कपाळ पाटी. डोळे . नाक . गाल . हनुवटी . दातांची रचना . स्मितहास्य . बोलणे. मग तुमची पोशाखाची रंगपसंती. इत्यादी गोष्टीवरून समोरच्या व्यक्तीला तुमचे भविष्य कळतंय ? हा माणूस कसा आहे ? किती कर्तृत्ववान आहे ? आपले कर्म आणि कर्तव्य इतरांना समजते. त्याला पर्सनल डेव्हलपमेंट म्हणतात. ते डोक्यावरील केस त्यांची रचना याच्यावर अवलंबून असते.
-
Tags:
आरोग्य