गुरुपौर्णिमेनिमित्त कार्ड मेकिंग व मेहंदी स्पर्धा उत्साहात साजरी

.      नवापूर (सत्यप्रकाश न्युज): 
   दि. एन. डी. अँड एम. वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच. जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर* येथे *गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने* विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि संस्कार वृद्धिंगत व्हावेत या उद्देशाने *कार्ड मेकिंग व मेहंदी स्पर्धेचे* आयोजन उत्साहात करण्यात आले.
कार्ड मेकिंग स्पर्धेत तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. यामध्ये एकूण 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पाचवी ते सातवी गटात  यामध्ये   
प्रथम क्रमांक – कु. प्रीशा गोसावी (६ वी ब)   
द्वितीय क्रमांक – रिया गोसावी (५ वी ब तृतीय क्रमांक – जैनब पठाण (७ वी ब)
आठवी ते दहावी गटात  
प्रथम – कुमार अरविंद राजपुरोहित (९ वी
ब)   
द्वितीय – कुमारी आयुषी पंचाल (१० वी ब) तृतीय – कुमारी अम्रीन शेख (९ वी ब)
*अकरावी ते बारावी गटात*  
प्रथम – प्राची गावित (१२ वी सायन्स बी)
द्वितीय – प्रार्थनीय गावित (१२ वी सायन्स बी)   
तृतीय – सोहेल पटेल (१२ वी कॉमर्स)
यांनी प्राविण्य प्राप्त केले.
या स्पर्धेत तयार करण्यात आलेले कार्ड्स विद्यार्थ्यांनी संस्थेचे सहसचिव श्री. शोएबभाई मांदा, मुख्याध्यापक श्री. संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख, उपप्राचार्य श्री. नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका व शिक्षकगण यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आदरपूर्वक अर्पण केली.
  मेहंदी स्पर्धेतही* विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तीन गटांमध्ये एकूण 47 विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
सातवी ते आठवी गटात   
प्रथम – हुमेरा शेख (७ वी ब)   
द्वितीय – लक्ष्मी लोणारी (८ वी ब)
नववी ते दहावी गटात  
प्रथम – अमरीन शेख   
द्वितीय – आसमा शेख (९ वी ब)
अकरावी ते बारावी गटात 
प्रथम – प्रीती गावित (१२ वी सायन्स बी
द्वितीय – हर्षाली गावित (१२ वी सायन्स बी) यांनी प्राविण्य प्राप्त केले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख, श्रीमती मेघा पाटील (पर्यवेक्षिका हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय)पर्यवेक्षिका श्रीमती निर्जलाबेन सोनवणे,  हे होते.
  कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या उपशिक्षिकाश्रीमती डॉ. कामिनी बेरी, श्रीमती चंद्रकला जाधव, श्रीमती बिनिता शहा व श्रीमती हेमलता बोरसे यांनी केले होते. या सर्जनशील उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजयकुमार जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

*गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर साजरा झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्व विकासाला प्रेरणादायी ठरला.*

Post a Comment

Previous Post Next Post