उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे संयोजक व आमचे परममित्र सन्माननीय महेश मुळे सरांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख

.   धुळे सत्यप्रकाश न्युज 
    राज्यातील  सर्व शिक्षकांचे आधार स्श्रीतंभ व यशस्वी मार्गदर्शक महेश मुळे सर लहानपणापासूनच संघ संस्कारात वाढलेले, विद्यार्थी परिषद, रा.स्व.संघ, जनकल्याण समिती, शिक्षक परिषद व आता भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विविध जबाबदा-या लीलया पार पाडणारे म्हणून एक समाजभिमुख नेता समाजसेवक. महेश मुळे हे धुळे जिल्ह्याला नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला माहीत असलेले नाव.
  शिक्षकांसाठी देणगी म्हणून लाभलेले शिक्षक नेते, आदर्श व निर्भिड व्यक्तिमत्व, उत्तम मार्गदर्शक सौजन्यशील व निस्वार्थी नेता, सक्रियतेचा पुरस्कर्ता, एक कलंदर शिक्षकः कार्यकर्ता एक चैतन्याचा झरा करारी व्यक्तिमत्व शैक्षणिक सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, कुटुंब वत्सल, लोकांना सतत जोडून ठेवणारा शिक्षकांचे प्रश्न आटोकाट प्रयत्न करून सोडविणारा नेता सदैव शिक्षकांच्या हितासाठी धुळे नाशिक, पुणे, मुंबई नागपूर पायाला भिंगरी बांधल्यासारखे सतत फिरणारे काय वर्णन करावे महेश मुळे सरांचे
 सर्व गुणसंपन्नता ही त्यांना मिळालेली दैवी देणगी आहे.
   नेत्याशिवाय समाज म्हणजे सुकाणू शिवाय जहाज असते. मुळे सरांची त्यागमय भावना हीच त्यांची व्यक्तिमत्त्वाची उत्तुंग व्याप्ती आहे. माणसे जोडणे हा त्यांचा छंद. माणूस तितका जोडावा, जोडलेला सांभाळावा, गुणानुसार योजावा, सत्कार्या लागी, !
   आपल्या शिक्षक धर्माच्या सत्कार्यात हजारो माणसांचा समुदाय सांभाळणारा हा अवलिया माणूस खरंच अतिशय ग्रेट आहे. त्रीशरी 'ष हळी सीशरीं पशी ह्या उक्तीप्रमाणे आपल्या आत्म्याची उत्तुंगता ही केलेल्या घडते. त्यागामुळेच हेच मुळे सरांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. माणसाचे कर्म शुद्ध व पवित्र असेल तर त्या कर्मातून निष्पन्न होणारे यश हे जगाला आदर्श ठरते. असा आदर्श मुळे सरांनी निर्माण केला आहे.
   एक संघ स्वयंसेवक सुरू झालेला प्रेरणादायी प्रवास आज राज्य संघटन पर्यंत पोहोचवणे इतके सोपे नाही त्यासाठी लागणारी धडाडी, सतत कार्यरत राहणं, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक समस्यांबाबत पाठपुरावा कडून त्या सोडवण, हजारो शिक्षक बांधवाच्या शैक्षणिक समस्या सोडवून पोटापाण्याला लावणे तसेच शिक्षकांविषयी असणारी आस्था, त्यांच्या प्रश्नांविषयी सतत पाठपुरावा अधिकाऱ्यांना समजावून त्यांच्याकडून सोडवून घेणे सोपे नाही. पण मुळे सरांचा शाळा संहिता शासन निर्णयाचा व न्यायालयीन कामकाजाचा दांडगा अभ्यास असल्यामुळे ते प्रत्येक समस्या लीलया सोडवितात. म्हणून ते राज्यभर शिक्षकांना ते अतिशय प्रिय व्यक्तिमत्व आहेत.
    दुसऱ्याला कायम मदत करणे व संकटकाळी जावून मदत करने हा त्यांचा स्थायीभाव आहे शिक्षकाचे ते समर्थ आहेत 'भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे' असे ते प्रत्येकाच्या पाठीशी निर्भीडपणे उभे राहतात. इतकं सगळं काही करतांना त्यांचे आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष कधीही होत नाही. आकाशात भिरभिरणारी घार जशी आकाशी उडत असते पण तिचे सारे लक्ष आपल्या पाखराकडे असते तसे त्यांचे लक्ष कुटुंबा कडे असते ते उत्तम कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व आहेत. त्याप्रमाणे ते हजारो विद्यार्थ्यांचे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत त्यांचे अनेक विद्यार्थी यु.पी. एस. सी.एम.पी.एस.सी डॉक्टर व इंजीनिअर झालेले आहेत. जशास तसे त्यांचा स्वभाव आहे चांगल्याला चांगले वाईटाला वाईट ते कधी कोचाईया लाटेला जात नाहीत निर्मळ मनाने आपल्या कामाची सकारात्मक रेष वाढवत असतात त्यांच्याकडून मिळणारे प्रेम आदर समाजात असलेली प्रसिद्धी, कीर्ती, उत्तम आरोग्य, अत्यंत निष्कलंक चारित्य उदात्त विचार, आपल्या निवडलेल्या कामात सातत्याने झोकून देण्याची तयारी त्यातून मिळणारे समाजाचे प्रेम यापेक्षा काय हवे असते माणसाला ?-
  मुळे सरांना हे सर्व काही मिळत आहे. आणि परमेश्वर त्यांना देत राहील. यापेक्षाही पुढील आयुष्यात त्यांना उत्तम आरोग्य लाभावे. यापेक्षाही भव्य दिव्य सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांच्या हातून घडावे.
  अशा निष्काम कर्मयोग्याची दखल समाज तर घेतच आहे पण ते ज्या पक्षात जन्मापासून एक निष्ठेने काम करत आहे त्या पक्षाने देखील त्यांना समाजभिमुख कामासाठी योग्य ती संधी उपलब्ध करून द्यावी अशी सर्वाचीच इच्छा आहे. श्री मुळे सरांची वाटचाल व त्यांचे जीवन सतत सुगंधीत व्हावे, तुम्ही आयुष्यात खूप सुखी राहावे, व तुमच्या कीर्तीचा सुगंध सतत दरवळत राहावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना-
  वाढ दिवसाच्या निमित्ताने माझ्या मनातील हे मनस्वी चिंतन त्यांच्या कार्यभावास अर्पण करतो व खूप खूप शुभेच्छा चिंतितो. जीवेत शरदः शतम !
शब्दांकन -श्री. सुनील मोरे, प्राचार्य जय हिंद हायस्कूल व कनिष्ठ महा विद्यालय, धुळे

Post a Comment

Previous Post Next Post