जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून काही तांत्रिक अडचणी व न्यायालयीन असलेल्या विविध याचिका, संचमान्यता आदि प्रकरणामुळे बदली प्रक्रियेला विलंब होत असला तरी बदल्या या होणारच याबद्दल राज्यातील शिक्षकांनी चिंतामुक्त रहावे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्वी नियतकालिक बदल्या कराव्यात ही विनंती करण्यात आली
मुख्यालय राहण्याची अट रद्द करणेबाबत,केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूपावर राज्यभरातून आलेले आक्षेपांचा विचार करून शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या एकत्रित सेवा जेष्ठतेतून केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी शासन निर्णय निर्गमित करणे
शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती बाबत राज्यात एक वाक्यता सुसूत्रता समानता येण्यासाठी एकत्रित मार्गदर्शनाचा सुस्पष्ट शासन निर्णय निर्गमित होणे बाबत.,केंद्रप्रमुखांची 100% पदे प्राथमिक शिक्षकांच्या एकत्रित सेवा जेष्ठतेतून भरणे बाबत ,उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदासाठी 150 विद्यार्थ्यां संख्येवरून 100 पटसंख्या असणाऱ्या शाळांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद मंजूर करणे बाबत ,पदवीधर प्राथमिक विषय शिक्षकांना सरसकट वेतोन्नती देणे बाबत,2018 नंतर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ मंजूर होणे बाबत , राज्यातील जिल्हा परिषद शाळांना जिल्हा आर्थिक विकास नियोजन मंडळातून सोलर पॅनल उपलब्ध करून देणे बाबत जिल्हा परिषद केंद्र शाळांना डाटा एन्ट्री ऑपरेटर मानधन तत्त्वावर नियुक्त करणेबाबत , जिल्हा परिषद प्राथमिक /माध्यमिक शाळांना कॅशलेस विमा योजना मंजूर करणेबाबत ,ग्रामविकास विभाग बदली धोरण 18 जून 2014 मधील तरतुदी प्रमाणे पूर्वी अवघड क्षेत्रात सेवा करून आल्या शिक्षकांना पुन्हा अवघड क्षेत्रात न देणेबाबत
40 वय वर्ष असलेल्या पत्राच्या दगडाच्या कौलारू धोकेदायक मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांना निष्काशीत करून नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी देणे बाबत एकाच आवारात भरणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक/ माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन एकच करणे बाबत उच्च विद्या विभूषित नेट, सेट, एम फिल ,पी एच डी ,अहर्ता प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना विस्तार अधिकारी( शिक्षण) गटशिक्षणाधिकारी यांच्या पदोन्नती मध्ये प्राधान्य क्रमाने विशेष आरक्षणाची तरतूद करण्याबाबत*.
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी 50 टक्के गुणांची अट रद्द करणे बाबत
उपरोक्त प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ABRSM संलग्नित शिक्षक परिषदेच्या या शिष्टमंडळात प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे प्रांत कोषाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे प्रांत महिला आघाडी प्रमुख वैशाली काकडे प्रांत सहकार्यवाह नितीन पवार प्रांत महिला आघाडी सहप्रमुख सुरेखा ताजवे नागपूर विभाग कार्यवाह विजय साळवे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष देविदास सांगळे जिल्हा कार्य व साईनाथ भालेरावआदींचा शिष्टमंडळात सहभाग होता
Tags:
शैक्षणिक