वनिता विद्यालय, नवापूर येथे श्री गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ एल. के. पाटील मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सी. बी. बेंद्रे सर ( पर्यवेक्षक) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यिनींनी गुरूवंदनेने केली. इयत्ता दहावी 'अ' व 'ब' वर्गातील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अत्यंत नेटकेपणाने आणि प्रभावीपणे पार पाडले. सातवी ते दहावी या इयत्तांमधील विद्यार्थिनींनी गुरूप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे सादर केली.श्री आर.डी.भामरे सरांनी गुरुपौर्णिमा संदर्भात माहिती दिली. सकाळ सत्रामध्ये इ ५ वी व ६ वी च्या विद्यार्थिनींनी भाषणं केलीत सौ सोनवणे मॅडम यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यिनींमध्ये गुरूंच्या प्रती आदरभावना वाढीस लागल्याचे दिसून आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक बंधु व भगीनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले
Tags:
शैक्षणिक