सोशल मीडियाच्या काळात अचूक गुरु शोधणे हे कठीण - पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील

    नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   सोशल मीडिया, सायबर क्राईम सारख्या घटनांतून बोध घेऊन स्व गुरू शोधणे ही काळाची गरज आहे. सोशल मीडियाच्या काळात अचूक गुरु शोधण हे कठीण होत चालले आहे. आपल्याला अनेक गुरु भेटतात त्यांच्या मार्गदर्शनातून योग्य तो मार्ग स्वीकारणं आपले पहिले कर्तव्य आहे असे मत नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी येथील श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल येथे गुरूपौर्णिमा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
     यावेळी प्रमुख  अतिथी अॅड. टिमोल यांनी विद्यार्थ्यांना गुरुचे महत्व समजावून सांगितले फक्त गुगल आपला गुरु नाही तर ज्यांच्याकडून आपण शिकतो तेच आपले खरे गुरु आहेत हे पटवून दिले.
 तर मुख्याध्यापक मिलिंद वाघ उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख मेघा पाटील तसेच डॉ. गणेश महाजन. एड.अगाज टीमोल, शिक्षक भरत सैंदाणे, गणेश लोहार,जयश्री चव्हाण, सी. एस. पाटील, योगिता पाटील, दर्शन अग्रवाल उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून  करण्यात आली. इयत्ता बारावीच्या विद्याथ्यांनी स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले. तसेब विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेले ग्रीटिंग कार्ड्स शिक्षकांना देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. जयश्री चव्हाण व योगिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुरशिष्याचे महत्व आपल्या मनोगतातून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनोगतातून गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी गुरुंबद्दल कविता रचून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
     यावेळी भित्तिपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रिटींग कार्ड मेकिंग स्पर्धेचे परीक्षक जयश्री चव्हाण, गणेश लोहार व कविता खैरनार यांनी परीक्षण केले. भित्तिपत्रक स्पर्धेचे परीक्षण योगिता पाटील ,दर्शन अग्रवाल , कर्नल वसावे यांनी केले.
    विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावीची विद्यार्थिनी जयसेंजल गावित, सोनम गावित, पल्लवी गावित, निकम व दर्शन पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री चव्हाण व कविता खैरनारसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post