सार्वजनिक मराठी हायस्कूल नवापूर येथे वनपरिक्षेत्र कार्यालय व इको क्लब यांच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षदिंडी कार्यक्रम .

.   नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे "इको क्लब" व वनपरिक्षेत्र नवापूर प्रादेशिक कार्यालय यांचे कार्यालय संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये प्राचार्य श्री मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक श्री नारायण मराठे, पर्यवेक्षक श्री दीपक मंडलिक  कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख श्रीमती मेघा पाटील व प्रादेशिक वन विभागाचे वनपाल श्रीमती .सुनीता सुभाष पाटील ,श्री ए. एम. शेख, श्री आर एच चौधरी, तसेच वनरक्षक श्री यु.के. पाडवी, श्री एच. एम. माळी, श्री नरेश कोकणी व सर्व शिक्षक बंधू भगिनी व इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या समवेत वृक्षदिंडी काढण्यात आली आणि वृक्षारोपण करण्यात आले "एक वर्ग एक वृक्ष “ही योजना तयार करण्यात आली .शाळेतील प्रत्येक वर्गशिक्षक व विद्यार्थी यांनी झाडाची संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली .
        विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी इकोक्लब तर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.या अभियानास प्रोत्साहन देऊन वृक्षप्रेम वाढवून वृक्षसंवर्धन करण्यास प्रवृत्त करणे हा यामागचा उद्धेश होता. 
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली इको क्लब च्या सर्व सदस्यांनी तसेच वनपरिक्षेत्र नवापूर प्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी वर्ग व सर्व शालेय शिक्षक बंधू-भगिनी ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..

Post a Comment

Previous Post Next Post