धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे विकासाचे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असले तरी प्रत्यक्षात हे काम निकृष्ट दर्जाचे, अपूर्ण आणि अपघातांना आमंत्रण देणारे ठरले आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा महामार्ग नागरिकांसाठी 'मृत्यूमार्ग' बनला असल्याची संतप्त भावना नवापूर तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
याच महामार्गावरील नवापूर शहरात प्रवेश करतांना असलेल्या करंजी चौफुलीवर ठेकेदाराने मुरुम टाकल्याने दोन दिवसांपूर्वी एका ग्रामीण भागातील दुध व्यावसायिकाची गाडी घसरल्याने हात फ्रॅक्चर झाला आहे त्यामुळे आता पुढे व्यव साय करायचा कसा हा प्रश्न संबंधित व्यक्तीला पडला आहे कारण हाताचा खर्च हजारो चा घरात असुन सध्या तरी काही दिवस व्यवसाय बंद ठेवावा लागणार आहे केवळ ठेकेदाराच्या चुकि मुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा परिसरात होत आहे सदर व्यक्तीचा दवाखान्याच्या खर्च ठेकेदाराकडून वसुल करावा असेही बोलले जात आहे.
+
Tags:
गुन्हे/अपघात