'हरे रामा, हरे कृष्णाचा' गजरात भगवान जगन्नाथांची रथयात्रा उत्साहात संपन्न

.       नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   शहरात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) ध्यावतीने भगवान जगन्नाथ यांची भव्य रथयात्रा मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली. पावसाची पर्वा न करता शेकडो भाविकांनी रथयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळे नवापूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. फुलांनी आणि रंगीबेरंगी वस्तूंनी सजविलेला भगवान जगनाथ, बहीण सुभद्रा आणि बंधू बलदेव यांचा रथ भाविकांनी जयघोषात ओढण्यास सुरुवात केली. 'हरे कृष्ण, हरे रामा'च्या गजराने आणि मृदंग, टाळ यांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी केली. भगवान जगनाथांचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी भाविकांनी रांगोळ्या काढून आणि पेढे वाटून रथयात्रेचे स्वागत केले.
    रथयात्रेला श्री हनुमान मंदिरापासून उत्साहात सुरुवात झाली. गांधी पुतळ्याजवळिल  हनुमान मंदिर येथुन सुरू झालेली रथयात्रा मेन रोड, लाईट बाजार, सरदार चौक, राम मंदिर गल्ली, गुज्जर गल्ली, आंबेडकर चौक, बस स्थानक मार्ग आणि टाऊन हॉल अशा प्रमुख मार्गावरून मार्गस्य झाली. 
    रथ ओढण्याचे विशेष महत्व असल्याने जोरदार पाऊस असूनही भाविकांचा उत्साह जराही कमी झाला नाही. 'हरे रामा हरे कृष्णा' च्या गजरात भाविक भगवान जगनाथ यांचा रथ ओढून भक्तिरसात चिंब झाले होते.
   रथयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी नवापूरकरांनी भगवान जगन्नाथांचे पूजन करण आरती केली. हरे कृष्ण हरे रामा च्या जयघोषात भाविक भक्त नाचत होते चेहयावर आनंद स्पष्ट दिसत होता. रथयात्रेत सर्वांसाठी सुख, समृद्धी अन् शांती लाभण्याची केली प्रार्थना केली.
    शहरातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीने या यात्रेचा लाभ घेतला असून महिला मंडळाचा देखील उत्साह मोठ्या प्रमाणात होता तिव्र पावसात भिजून आपल्या आराध्य दैवताच्या रथयात्रेत सहभागी होऊन उत्सवाचा आनंद घेतला सायंकाळी नगर भवनात आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा देखील असंख्य भाविकांनी लाभ घेतला.
     सदर कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post