येथील शिंपी समाजाच्या होतकरू व अभ्यासू वृत्तीच्या सौ. वैष्णवी आकाश शिंपी यांची संजिवनी विद्यापीठ, कोपरगाव यांच्या स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत रशिया येथील युराल फेडरल विद्यापीठ, येकातेरिनबुर्ग येथे १५ दिवसांच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड झाली आहे. त्या दिनांक १९ जुलै रोजी रशियाकडे प्रयाण करणार आहेत.
विशेषत या यशात त्यांची दिड वर्षांची चिमुकली कन्या कु. श्रीशा आकाश शिंपी हिचे विशेष सहकार्य लाभले असुन कु.श्रीशा चे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
या यशाबद्दल सासरे श्री. मिलिंद शिंपी व सासूबाई सौ. स्वाती शिंपी (रा. कोपरगाव) श्री. आकाश शिंपी नितिन निकुंभ व आई सौ. मनीषा निकुंभ (रा. नाशिक) यांच्या सह कोपरगांव येथील शिंपी समाज बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व शिंपी समाजासाठी हि अभिमान स्पद बाब आहे.
Tags:
यश/ निवड