नवापूरः सत्यप्रकाश न्युज
जिल्हाधिकारी नवापूर येथे लम्पी नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर बैठक तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली लम्पी त्वचा रोगाबाबत बैठक घेण्यात आली. त्याअनुषंगाने काल तहसिलदार मंदार कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी नवापूर शहरात मोकाट गुरांना नजीकच्या गोशाळेत दाखल करुन लसीकरण करुन घेण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, मुख्याधिकारी स्वप्नील मुघलवाडकर, पंचायत समिती सदस्य, सहाय्यक आयुक्त ५ (पशुसंवर्धन), पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये गोवर्गीय जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लम्पी त्वचारोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री पशुसंजीवनी योजना अंतर्गत तालुक्यातील जनजागृती करून लम्पी त्वचा रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून मोहिम सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच हा आजार सदृश्य जनावरे आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरातील किमी अंतरावरील रोगप्रतिबंधक गावात लसीकण करण्यात येत आहे. तालुक्यातील गोशाळेतील गोवर्गीय जनावरांना लसीकरण करण्यात आलेले आहे. नवापूर शहारात आढळणाऱ्या मोकाट जनावरांना नवापूर नगरपरिषदेतर्फे नजीकच्या केले आहे.
गोशाळेत दाखल करुन लसीकरण करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. तसेच बाजार समितीतील व्यापाऱ्यांना सध्या जनवारांची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यात सध्या कुठेही लम्पी त्वचा रोग प्रादुर्भाव नसला तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगर परिषदेमार्फत जनावरांच्या गोठ्यात औषध फवारणी व धुरळणी करण्याचे आवाहन गट विकास अधिकारी चंद्रकांत माळी, मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर यांनी केले आहे.
Tags:
सामाजिक