नवापुर सत्यप्रकाश न्युज
तालुक्यातील ८१ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.
एकुण २५९ प्रभागांकरिता ७०९ सदस्य व ८१ सरपंच यांच्या करिता निवडणुक पार पाडली जाणार आहे.
एकुण१२९०९६ पैकी ६६६०७ स्त्री मतदार तर ६२४८९ पुरुष मतदार आपला हक्क बजावु शकतात.
यासाठी विविध विभागातील वरिष्ठ सहायक दर्जाचे ४१ निवडणुक निर्णय अधिकारी व तितकेच सहायक निवडणुक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत.
सर्व कामकाज तहसिल कार्यालय येथुन चालेल. नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी व सुरेखा जगताप कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी लक्ष ठेवुन आहेत
दरम्यान आज सकाळी सर्व निवडणुक निर्णय अधिकारी यांची बैठक घेऊन सविस्तर सुचना देण्यात आल्या आहेत.
Tags:
शासकीय