प्रा.प्रकाश भांडारकर लिखित प्रारब्ध पुस्तकाचे आज प्रकाशन ........

प्रा.प्रकाश भांडारकर लिखित प्रारब्ध पुस्तकाचे आज प्रकाशन    दोोंडाईचा सत्यप्रकाश न्यूज 
      येथील सेवानिवृत्त प्रा. प्रकाश भांडारकर लिखित प्रारब्ध या पुस्तकाचे प्रकाशन माजीमंत्री नानासाहेब हेमंत देशमुख यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमास प्रा.दत्ता वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.सदर पुस्तकात लेखकांनी आपल्याच जीवनाचे चरित्र दर्शन प्रस्तुत केले आहे.
     आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन आपण सर्वानी या पुस्तकाचे वाचन करून प्रा.प्रकाश भांडारकर यांच्या जीवनावरील घडामोडींचा अभ्यास करायला हवा. तूर्तास एवढेच 
" हे पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. एका भागात आणि दुसऱ्या भागात स्वतःच्या जीवन चरित्राचे दर्शन घडविले आहे.
जग ही एक रंगभूमी आहे. हे खरे आहे. त्या रंगभूमीवर तऱ्हेतऱ्हेची पात्रे प्रत्यक्ष जगात पहायला मिळतात. नित्याच्या सर्वसाधारण माणसापेक्षा त्याचे वागणे, बोलणे वेगळे आणि तन्हेवाईक असते हे सहज लक्षात येते. मग त्यात आयुष्यभर नैराश्याचे गाठोडे डोक्यावर घेऊन फिरणारा या पुस्तकातला निराश मेहरा असेल किंवा व्यवहाराचा आणि वागण्याचा काही संबंध नसतो हे बागण्यातून दाखविणारा 'अचाट बापू' असो, नाही तर विचारपूर्वक न बोलता बेधडक वागणारा, बोलतांना शुद्ध अशुद्ध असे काही असते याची पुसटशी जाणीव नसलेला तरीही आपल्या बडबड्या बोलक्या स्वभावामुळे छोट्या माणसापासून या राजकीय नेत्यांपर्यंत परिचय असलेला 'अफलातून तात्या' असेल, यांनी आपल्या जगावेगळ्या वागण्यातून आनंदच दिला आहे.
    या सर्व व्यक्तींच्या चित्रणातून लेखकाच्या भाषाशैलीचा आविष्कार स्पष्टपणे जाणवतो. भाषेच्या सामर्थ्यातून चित्र डोळ्यापुढे उभे राहिले पाहिजे असे म्हणतात.. त्याचा प्रत्यय लेखकाच्या भाषाशैलीतून येतो. प्रकाश भांडारकर हे इंग्रजी विषयाचे प्रथितयश प्राध्यापक आहेत, त्यांना वाङ्मयीन अंग आहे हे त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होते.
    दुसऱ्या भागात लेखक प्रकाश भांडारकर यांनी आयुष्याचा संघर्षमय जीवनपट मांडला आहे. आयुष्यात संपन्न जीवनातून दारिद्र्य येणे ही शोकांतिका आहे आणि ते सांगतांना दुःख होते. परंतु दारिद्र्यातून संपन्न आयुष्य मिळविले तर त्याचा सार्थ अभिमान वाटतो. अभिमानाने ते लोकांपुढे मांडता येते. ते काम येथे लेखकाने केले आहे, जे गौरवास पात्र आहे. एका कवीने म्हटले आहे,
    'दारिद्र्य मरण यातुनि मरण बरे वा दरिद्रता खोटी.
  मरणात दुःख थोडे दारिद्र्यात व्यथा असे मोठी या दारिद्र्याची व्यथा प्रा. प्रकाश भांडारकर यांनी अनुभवली आहे. ती व्यथा, दारिद्र्य सांगतांना त्यांना अभिमान वाटतो याचे प्रत्यंतर येते, कारण त्या संघर्षानिच त्यांचे जीवन संपन्न केल्याचे त्यांनी अनुभवले आहे.

अगदी हॉटेलवर कपबशा विसळणे, किराणा दुकानावर मजुरी करणे, तोकड्या मजुरीवर काज- बटण करणे इ. कामे केली, आजारी आईसाठी कसायाकडे उधारीने मटन मागणे यासारखी लाचारीही पत्करली. ही गोष्ट त्यांच्या आयुष्यातील लाचारीच्या संघर्षाचा परमोच्च बिंदू आहे..

कॉलेजची ५४ रुपयाची फी भरणाऱ्या शेठ दुकानदारामध्ये त्यांनी देव पाहिला. ज्या ५४ रुपयांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ती कृतज्ञता लेखकाने बाळगली आहे. प्राध्यापकाची नोकरी मिळाल्यावर नाट्यसंस्था सुरू करणे, लघुपट तयार करणे, त्यांच्या या प्रवासात अभिनय कौशल्य, साहित्यिक -अंग असल्याचे सहज जाणवते.
   शेवटी स्वतःच्या अंगभूत गुणांनी त्यांनी आपले आयुष्य सुकर करून घेतले. पत्नीवियोग, नंतर दुसरे कुटुंब या सर्व गोष्टी हाताळून सुखी जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या आनंदयात्रीच्या सर्व बाबी विचार करायला लावणाऱ्या आहेत. ही रणा इतरांनाही याच दिशेने विचार करायला प्रवृत्त करेल, अशी आशा करून या न्मित्राला आयुष्यात यश मिळो अशी आशा व्यक्त करतो.

Post a Comment

Previous Post Next Post