नवापूर सत्यप्रकाश न्यूज
तालुक्यातील 81 ग्रामपंचायत निवडणूक आज होणार असून नवापूर प्रशासन या निवडणूक प्रक्रिये साठि सज्ज झाले असून आज येथील कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा हाजी मुसाजी मुल्ला वसतिगृहाचा आवारात निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले.
आज सकाळपासून तहसिलदार मंदार कुलकर्णि,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप,मिलिंद निकम कुलकर्णी आदींचा उपस्थितीत निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले 81 ग्रामपंचायत व विविध प्रभागाची यादी बॅनर द्वारे मंडपात लावण्यात आली होती त्यामुळे आपले साहित्य कोणत्या टेबलावर प्राप्त होईल हि माहिती येणारा 1 ते 21 टेबलावरून 254 पथकातील निवडणूक कर्मचारी सदर बॅनर वर आपले नांव व मतदान केंद्राचे नांव पाहून सरळ आपल्या टेबलावर पोहचत होता व साहित्य घेत होता.
नवापूर तालुक्यातील एकूण 256 मतदान केंद्रावर प्रत्येकी 6 कर्मचाऱी असे जवळपास 1550 कर्मचाऱी त्यात मतदान केंद्राध्यक्ष, 3 सहकारी कर्मचारी व एक शिपाई असे कर्मचाऱी नियुक्त केले आहेत यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक ,वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महिला व पुरुष कर्मचाऱी असून तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर सुरक्षित साठि नंदुरबार येथील जिल्हापोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या सहकारी कर्मचारी निजाम पाडवी,योगेश साळवे आदींसह सदर ठिकाणी भेट दिली.
तर निवडणूक साहित्य घेऊन आपल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी जवळपास नवापूर आगारातून 40 बसेस ची सोय केली असून आगारातून सुसज्ज अशा 40 बस घेऊन आगार प्रमुख राजेंद्र अहिरे ,वसंत गावीत ,पवार ,कराळे आदींसह नवापूर आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
Tags:
शासकीय
Nice information
ReplyDelete