निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले सादर करावे.......

निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले सादर करावे........
नंदुरबार, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) 
   : राज्य शासकीय सेवानिवृत्तधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी  हयातीचे दाखले 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दे.ना.पाटील यांनी केले आहे.
   निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची नोव्हेंबर महिन्यात हयातीबाबत नियतकालीक ओळख पडताळणी दरवर्षी करण्यात येते. जिल्हा कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्ती वेतन धारकांचे नाव, निवृत्तीवेतन क्रमांक व बँक खाते क्रमांक असलेले मुद्रीत दाखले संबंधित बँक शाखेत उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांनी स्वत: बँकेत जाऊन दाखल्यावर स्वाक्षरी करावी. अन्यथा निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन डिसेंबर 2022 पासून रोखून धरण्यात येईल याची निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी.
=========≈================
निवृत्ती वेतनधारकांनी आयकर परीगणनेसाठी बचत तपशील कळवावा......
नंदुरबार, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी वित्तीय वर्ष २०२२-२३ च्या आयकर परिगणना व आयकर कपात करण्यासाठी विहीत बचतीचे कागदपत्रे जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे 20 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दे.ना.पाटील यांनी केले आहे.
  जे निवृत्ती वेतनधारक बचत तपशिल विहीत मुदतीत सादर करणार नाही त्यांनी कुठल्याही प्रकारची बचत केली नसल्याचे गृहीत धरुन देय आयकर त्यांच्या मासिक निवृत्तीवेतनातुन कपात करण्यात येईल. असेही श्री.पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post