श्रीमती पी. ए. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 12वीत मृणाल जाधव प्रथम

नवापूर - सत्यप्रकाश न्युज 
      सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला. यात विज्ञान शाखेत प्रथम - मृणाल सतीश जाधव 87.33%, गुण मिळवून शाळेत उज्ज्वल यश संपादन केले, तर द्वितीय - श्रुती संदीप सोनवणे - 87.17%, भुवनेश्वरी हेमंत वळवी 87.17%, तृतीय - सुवर्णा अनेश गावीत 86.17%, चतुर्थ- तनुश्री जगदीश जयस्वाल 85.83%, पाचवा - हर्ष दत्तात्रय भामरे - 85.33% यांनी शालेय गुणवत्ता यादीत यश मिळवले.
         यंदा कला शाखेचा निकाल 97.07% लागला. यात प्रथम- अंजली विनोद परदेशी - 78.67%, द्वितीय - लक्ष्मी जगन गावीत 78.17%, तृतीय - गौरव रमेश गावीत 75.50%, चतुर्थ - बिना सुनील गावीत 75.50%, तर पाचवी- शुभांगी जतिन गावीत 74.17% यांनी यश संपादन केले. 
             यावर्षी शाळेचा एकूण निकाल 97.50% लागला असून शाळेने या वर्षीही उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत उत्तम यश मिळवले. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विपीनभाई चोखावाला, कार्याध्यक्षा शितलबेन वाणी, उपाध्यक्ष शिरिषभाई शहा, सचिव राजेंद्रभाई अग्रवाल, सहसचिव शोएब भाई मांदा, कोषाध्यक्ष सतिषभाई शहा, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख मेघा पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..

Post a Comment

Previous Post Next Post