आरोग्य धनसंपदा ग्रुप आजीबाईचा बटवा
विषय - दवाखाना किंवा
हाँस्पिटल आणि आपणं - किंवा मी
सर ! मी सौ.अस्मिता कुलकर्णी
देवगड.ता.- अकोले.जि.- नगर
माझंं वय ६२ वर्ष.मी माजी मुख्याध्यापिका आहे .मला थोडं ब्लडप्रेशर.किंचित शुगर.अशक्तप
णा.पाय दुखतात.अँसिडिटी.अश
क्तपणा आहे. मी आतापर्यत फँमिली डाँक्टर ते स्पेशालिस्ट डाँ
क्टर पर्यत गेले. अनेक रक्त लघवी
चाचणी .सोनोग्राफी.केल्यात.पणं फरक पडतचं नाही.
पणं सर ! मला थोडी माहिती हवी होती.
१) डाँक्टर आणि पेशंट हे एक फँमिली डाँक्टर कसे हवेत?
२) दवाखान्यात सर्वसामान्य नियमावली कशी असते.
३) प्रत्येक डाँक्टर हा देव असतो ?
४) रोगमुक्ती म्हणजे काय ?
५) रोग निदान म्हणजे काय ?
अतिशय महत्वपुर्ण प्रश्न विचारले ?
आरोग्य सेवा हि एक ईश्वर सेवा हे वैद्य .डाँक्टर.वैद्यक यांना पुर्वीही ,देवासमान मानले जात होते. काळानुरुप आता बराचसा बदल झाला आहे.आज याला धंद्याचे स्वरुप मिळाले. कारण आपणं सर्वच क्षेत्रात औद्योगीकर
ण क्षेत्रात प्रगती करत आहोत.
काळ बदलला, आपणं बदललो,
माणसंही बदलली.
फँमिली डाँक्टर ही कन्सेप्ट बदलली.आपला देश हिन्दुस्थान होता.इ.स.नतंरही बरेच दिवस मुस्लिम राजे भारतावर राज्य करित असतांना,इग्रंजाच्या काळातही राज्य करित असतांना प्रत्येक घराला कर स्वरुपात शेतसारा व इतर जातीनिहाय उदाः
न्हावी.सुतार.शिंपी,सोनार.मांग.इ.यांना शेतात बोलवुन वर्षाचा मोबद
ला हा शेतात धान्य चौथाई म्हणुन दिला जात असे.म्हणजे वर्षभर यां समाजातील व्यक्तीने मोफत सेवा करायची. हे जणु त्याघराचे पालन
कर्ते याला *गव्हाई* म्हणतात.हिच पध्दत आपला फँमिली डाँक्टर
म्हणुन रुढ झाली.या डाँक्टरांना
वर्षानुवर्षे त्या घराण्यातील सर्व इतिहास माहिती.चुली पर्यंत जाणे.वेळोवेळी आरोग्य चा उपचार करुन वर्षानतंर *दिवाळी*
सणाला शेतातील माल विकला की डाँक्टरांची *उधारी* चुकती करणे.पणं आता गिव्ह अन् टेक पाँलिसी आहे.त्यात *गरज सरो अन् वैद्य मरो* तु काय तुझा बाप वेगळा. भरपूर डाँक्टर आहेत ?
पेशंट डाँक्टरांना तोंडावर सांगतो.
याला कारणं *महागाई* शैक्षणिक बाजार.गुणवत्ता वाढ,पैश्याची मजोरी.राज्यकर्ते राजकारणात मग्न ! शैक्षणिक क्षेत्रात लक्ष देण्यास वेळ कुठे आहे ?
राज्यकर्ते,पुढारी यांच्या शैक्षणिक संस्था.काँपी,क्लासेसची भरमसाट फि.जिल्हापरिषद शिक्षण दर्जा.खाजगी काँलेजेसची चढाओढ ,शिक्षक भरती घोटाळा
इत्यादी कारणांनी आरोग्य सेवा हि आता गँस वर येऊन पैश्याची मुजो
रीने फुगत आहे.प्रामाणिकपणा
हा कुठेही नाही.*जिवो जिवस्य
जिवनम्!! * त्यामुळे *फँमिली डाँक्टर* ही पध्दत कुठेही दिसत नाही.
२) दवाखान्यात ,हाँस्पिटल ला काही बंधन.नियम असतात का?
हो, आहेत.असतात.
१) दवाखान्यात शांतता पाळा
२) आपणांस नेमकं काय होत ? याची थोडक्यात माहिती सांगावी.
३) जास्तवेळ बसु नये.
४)ताप,सर्दी,खोकला ,संसर्ग
जन्य रोगी यांच्या जवळ बसु नये.
मास लावावा.
५)अभ्यगतांनी दवाखान्यात वातावरण शांत ठेवावे.
६) कुणाशी जास्त बोलू नका.
७)गोपनियतेमुळे अभ्यगतांनी दवाखान्यातिल नर्स.कंपाऊंडरशी
सल्लामसलत करु नये.
८)क्लिनिक.वार्ड मधे रुग्णाजवळ फक्त एका व्यक्तीनेच
थांबावे.
९) डाँक्टरांना देव समजु नका.
स्वतः हुन *मला इन्जेक्शन द्या.स
लाईन द्या* डाँक्टरांना आग्रह करु नये.वाटल्यास तर ते देतिल.
१०) सर्वच समाजसेवेची अपेक्षा डाँक्टरांकडुन करु नका.
११) डाँक्टर ,हाँस्पिटल ला भेटावयास येण्याची वेळ टाईम बोर्डवर लिहले आहे.त्याचवेळी या.
१२)रात्री बे रात्री भेटु नये.
१३)डाँ.हा माणुस आहे.हे समजुन वागा.
१४)डाँ.निदान कधी चुकू शकते.डाँक्टर .कर्मचारी,नर्स .वार्डबाय यांच्यावर हल्ला करु नका.मालमत्ता नुकसान करु नका. केल्यास - ३वर्ष सक्त मजुरी
अजामिनपात्र गुन्हा .पंन्नास हजार दंड.नुकसानभरपाई ची दुप्पट रक्कम वसुल केली जाईल.
१५)जुने आजार.अँलर्जी विषयी डाँक्टरांना अगोदर माहिती सांगा.व्यसने सांगा.
१६) इन्जेक्शन .गोळ्याची अँलर्जी विषयी सांगा.
१७) गंभीर पेशंट ला प्रथम भेटायला येऊ द्या.
१८) एका डाँक्टराकडुन दुसरे डाँक्टराकडे जातांना प्रथम अगोदरची सर्व रिपोर्ट फाईल्स नविन डाँक्टरांना दाखवा.
१९) डाँ.फी विषयी बिनधास्त रहा.
२०) आपले रिपोर्ट .निदान.
आजार कुणाला बारिकसारिक सांगू नका.
३) *प्रत्येक डाँक्टर हा देव असतो* --- हो.कारणं .व्यक्तीला मृत्यूच्या शेवटच्या घटकापर्यत तो
माणसाला वाचविण्याचा प्रयत्न करतो. तो यमाचा दुत आहे.देवाचां देव आहे.पणं आज आरोग्य शास्र हे पैश्याच्या पुढे धावणारे आहे.
माणसा पेक्षा पैसा श्रेष्ठ आहे.की पैसा बोलता है ! माणुसकी कुठेही दिसत नाही. आज या देवाला माननं न माननं हे व्यक्ती कडे गेले आहे. मेडिकल सायन्स हे एक मानवी शरिरावर उपचार करणारी पध्दत आहे.पणं यात - अँलोपँथी,
आयुर्वेद.होमिओपँथी,युनानी.नँचरोपँथी,फिजिओथेरँपी इत्यादी पध्दती आहेत.प्रत्येक पध्दती या वेगवेगळ्या सिद्धांतावर आधारित आहेत.शेवटी उपचार करणारे डाँक्टर हे निकषाच्या आधाराने निदान लक्षणाच्या अभ्यासाने करतात.विश्वास हि एक श्रध्दा असते.मानलं तर देव ? ---
४) रोगमुक्ती म्हणजे काय ?
निरोगी अवस्थेत चैतन्यशक्ती मधे बिघाड झाला .तर रोगी समजला जातो.हि चैतन्य शक्ती म्हणजे मन,मानसिकता,मेंदु.विचा
र. माईन्ड होय.या विचारात असमाधान,बेचैनी.वैचारिकता,अशक्तपणा निर्माण झाला .तर तब्येत बिघडते,आपण आपले खाणे,पिणे,वागणे,नितीमत्ता,बोलणे सुस्थितीत नसले तर कुठलाही रोग उदाहरणार्थ हायपरटेन्शन डायबेटिज.पक्षवात,वातविकार कुठलाही पटकन होऊ शकतो,हि रोग होण्याची कारणे आहेत.आप
णं कसं वागावं.काय खावं,प्यावं हे आपणांस जिवनात कधी कळत नाही,म्हणुन आजारपण लवकर येते.याला माणुस जबाबदार आहे.
५) रोग निदान म्हणजे काय ?
आपणांस कोणताही आजार प्रतिकारशक्ती कमी झाली तर पटकन होऊ शकतो.त्याचं निदान हे लक्षणे .चिन्हे.कारणे तपासणी
लक्षणे,रक्त,लघवी,सोनोग्राफी. स्कँन यावरुन होत असते.आजार कोणत्या स्वरुपाचा आहे.त्याचा शरिरावर अधिशियन काळ किती दिवसाचा असतो.त्या आजाराचे भविष्यविन्यान कसे आहे.हे उपचार करणारे डाँक्टर.वेद्य यांना अभ्यासानुसार कळते.प्रथमतः आपण डाँक्टरांकडे गेल्यावर सर्व शारिरीक तपासणी .विचारलेल्या प्रश्नांची व लक्षणे .चिन्हे यांची माहिती सविस्तर ,सविनय सांगितले तर डाँक्टर आजाराचे निदान करतात. रोगमुक्ती सहज होऊ शकते.
मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक

Tags:
आरोग्य