बुरझड हायस्कूल येथील माध्यमिक शिक्षक श्री रमेश अमृतकर सर यांची नुकतीच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी श्री अमृतकर सर यांना नियुक्तीपत्र देत त्यांची राज्य कार्यकारणी वर निवड केली आहे.
श्री रमेश अमृतकर सर हे बुरझड हायस्कूल येथे मागील सुमारे पंचवीस वर्षापासून माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून शैक्षणिक संघटनांमध्ये काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव असून त्यांनी विविध संघटनांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलेले असून त्याचप्रमाणे त्यांचे सामाजिक क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे. त्यांचा हा अनुभव पाहता त्यांची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. श्री अमृतकर सर यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र टीचर असोसिएशन च्या सर्व पदाधिकाऱ्यां तर्फे तसेच प्रा जसपालसिंग सिसोदिया सर, बन्सीलला खलाने सर, सागर पाटील सर, पाटील सर आणि शै्षणिक क्षेत्रातून व सामाजिक, राजकीय क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Tags:
यश /निवड