नवापूर- सत्यप्रकाश न्युज
नंदुरबार लोकसभा निवडणुकीत
मतदान बंदोबस्तासाठी बाहेरगावाहून तसेच जिल्हातील ६०० व नंदुरबार जिल्हातील १०० पोलिस अंमलदार व होमगार्ड यांची राहण्याची व भोजनाची व
तसेच उन्हाळ्यात कर्मचारी यांना थंड पाणी ,शरबत वाटप करण्या कामी योग्य सहकार्य केल्या बद्दल सर्व मान्यवरांच्या सत्कार सन्मान नवापूर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक यांच्या दालनात करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत मतदान बंदोबस्तासाठी आलेले पोलिस अधिकारी ,कर्मचारी,होमगार्ड,यांची राहण्याची उत्तम व्यवस्था पाण्याचे नियोजन केल्या बद्दल नवापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे ,उपनिरीक्षक मनोज पाटील,भाऊसाहेब लांडगे,अ.स.इ युवराजसिंग परदेशी,पो हे का विनोद पराडके,रणजीत महाले यांनी केला यात सत्कारार्थी मध्ये कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ए जी जयस्वाल, भदाणे सर,जय हिद छाञायलाचे व्यवस्थापक हरीष पाटील,अँड नितिन देसाई,मारुती स्ट्रिलचे मालक राजुभाई अग्रवाल,ध्रुवेश अग्रवाल,माजी नगरसेवक दर्शन पाटीव,मयुर सिंधी,नवापूर नगरपालिकेचे कर्मचारी संदिप शिंदे,धनसुख गावीत,सलीम शेख,आचारी विनोद गोसावी,हर्षल गावीत सर,सतिष गावीत,वायरमन जितेंद्र पाटील आदीचा सत्कार सन्मान करण्यात आला.
या नंतर मतदान शांत व सुरळीत पार पाडल्या बद्दल प्राचार्य ए जी जयस्वाल यांनी नवापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या सत्कार केला.यावेळी प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे म्हणाले की लोकसभा निवडणुकाचा अनुशंगाने बंदोबस्त करीता ७०० पोलिस कर्मचारी नवापूर शहरात आले होते.सदर कर्मचारी यांची राहण्याची भोजनाची,तसेच पिण्याचा पाण्याची व्यवस्था करीना करता सिनियर कॉलेज,जयहिंद छाञालय,अग्रवाल भवन,हनुमान वाडी,कस्तुबा गांधी छाञालय,असे विविध वस्तीगृह येथे राहण्याची उत्तम व्यवस्था केली नमुद आस्थापना यांनी त्याचे होस्टेल व हॉल उपब्लध
करुन दिले त्या ठिकाणी त्याची लाईट,पंखे,पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली त्या करीता सर्वानी दिवस राञ मोलाचे सहकार्य केले त्यामुळे पोलिसांना त्याचे कर्तव्य योग्य प्रकारे करता आले.नवापूर विधानसभा मतदार संघा मध्ये मतदानाचा दिवशी कुठे ही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे नवापूर पोलिस प्रशासन सर्वाचे आभार मानले.या नंतर प्राचार्य ए जी जयस्वाल यांनी पण आपल्या मनोगतातुन मतदानाचा दिवशी चांगला बंदोबस्त केल्या बदल पोलिस प्रशासनाचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे सुञसंचलन उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी केले तर आभार पो हे का विनोद पराडके यांनी मानले.
Tags:
सामाजिक