महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने दिनांक 31 मे 2024 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांना आगामी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची उमेदवारी निश्चित केलेली असून दिनांक 3 जून 2024 रोजी शुभांगी ताई पाटील या नाशिक आयुक्त कार्यालय नाशिक येथे सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. असे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ठरले. या उमेदवारीला राज्य उपाध्यक्ष प्रा जसपाल सिंह सिसोदिया यांच्या सूचनेनुसार राज्य सचिव श्रीमती प्रतिभा आजळकर व राज्य कार्यकारणी सदस्यांनी अनुमोदन दिले.
शिक्षक मतदार संघ निवडणुकीला कमी वेळ शिल्लक असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. त्या मुळे संघटनेचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक, शिक्षक बंधु - भगिनींनी आप आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात शुभांगी ताईचां प्रचार करावा. असे आवाहन महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
.
Tags:
निवडणूक