नवापूर तहसीलदार पदाचा कार्यभार श्री दत्ता जाधव यांनी सांभाळला

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   येथील तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी पदि श्री दत्ता जाधव यांनी कार्यभार सांभाळला  असून नवापूर तालुक्यातील समस्या सुटतील अशी चर्चा नवापूर वाशियांकडुन होत आहे.
    गेल्या कित्येक दिवसांपासून नवापूर येथील तहसिलदार व कार्यकारी दंडाधिकारी हे पद रिक्त होते प्रभारी तहसिलदार म्हणून नायब तहसीलदार सौ.सुरेखा जगताप यांनी अत्यंत व्यवस्थित सांभाळला या कार्यकाळात लोकसभा निवडणुक देखील पार पाडली.
    आता नवीन तहसीलदार पदि श्री दत्ता जाधव यांनी आपला कार्यकाळ सांभाळला आहे श्री दत्ता जाधव साहेबांनी संगमनेर व सिन्नर येथे आपला कार्यकाळ पूर्ण केला असून दैनिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्यांची भेट घेतली असून पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले व विविध विषयांवर चर्चा केली.

Post a Comment

Previous Post Next Post