सार्वजनिक गुजराती हायस्कुल येथे 'जागतिक आदिवासी दिवस' कार्यक्रम उत्साहात साजरा

नवापूर : सत्यप्रकाश न्युज 
दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दि एन.डी. एन्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे 9 ऑगस्ट रोजी *जागतिक आदिवासी दिवस*  उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य मा. श्री संजयकुमार जाधव,  उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख, पर्यवेक्षक फारूक, उर्दू विभागाचे पर्यवेक्षक जाहीद खान,  सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व  विद्यार्थी  उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासींचे कुलदैवत याहामोगी मातेचे पूजन व प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी  आदिवासी बोलीभाषेतील स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले.  कार्यक्रमात पुढे आदिवासी बोलीभाषेतील विविध पारंपारिक लोकगीत व लोकनृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर  उत्साहाने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही सहभाग घेत आदिवासी लोकगीतांवर नृत्यचा आनंद घेतला. शाळेत जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना श्रीमती यास्मिन फकीर, श्रीमती चंद्रकला जाधव, श्रीमती निर्जलाबेन सोनवणे व श्रीमती कामिनी बेरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती यास्मिन फकीर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती चंद्रकलाबेन जाधव यांनी केले . शाळेचे प्राचार्य मा. श्री संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख यांच्या मार्गदर्शनाने, सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post