ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात महिला अत्याचार समिती, व विशाखा समितीची कार्यशाळा संपन्न. कोळसेवाडी

ठाणे:कल्याण सत्यप्रकाश न्युज 
    येथील नूतन ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालय कल्याण (पूर्व) येथे मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा घटनांवर प्रतिबंध बसवण्यासाठी, व कायद्याच्या बाबतीत विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये माहिती प्राप्त व्हावी यासाठी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अशोक कदम साहेब,वैद्यकीय अधिकारी  डॉ.विद्याधर गांगण व शाळेचे जुने कार्यकर्ते श्री.ठाणगे सर यांचा उपस्थितीत  9वी  व10वी च्या विद्यार्थी व पालकांची कार्यशाळा  आयोजित करण्यात आली होती.
 यावेळी  शाळेसाठी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली.
1) महिला तक्रार निवारण समिती म्हणजेच विशाखा समिती
2)  सखी सावित्री समिती.
 विशाखा समितीच्या अध्यक्षा सौ.रुपाली तुषार गुजराथी यांनी शालेय आवारात, कार्यालयांमध्ये होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळ ह्यावर प्रतिबंध घालणे व महिला कर्मचारी, विद्यार्थीनी ह्यांच्या लैंगिक समस्या सोडवणे ,हा ह्या समिती चा उद्धेश आहे. तसेच पीडित व्यक्तीच्या समस्येवर ही,ही समिती उपाय योजना करते, आणि पीडितेला न्याय मिळवून देते असे आपल्या भाषणात सांगितले.यावेळी कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री.अशोक कदम साहेब यांनी पोस्को कायदा काय आहे ! केव्हा लागू होतो? ह्याबद्दल पालकांना व  शिक्षकांना सविस्तरपणे  माहिती दिली.तसेच 1098 व 112 हे दोन्ही नंबर कायम आपल्या लक्षात असू द्या, हे नंबर अतिशय महत्त्वाचे आहेत कोणत्याही आपत्ती च्या वेळी हे नंबर फिरवल्यावर 5/10 मिनिटांच्या आत पोलीस मदत तसेच लगेचच रुग्ण वाहिका उपलब्ध होते. तसेच माहिती असूनसुद्धा गुन्ह्याची तक्रार जर पोलीस स्टेशन ला दिली नाही तरीदेखील त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते,याबाबत सविस्तर माहिती पोलिस निरीक्षक श्री अशोक कदम  यांनी दिली.
 तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गांगण यांनी विद्यार्थ्यांचा आहार कसा  असावा. मैदा शरीराला कसा घातक आहे,  कुरकुरे, चिंगम,फ्रायम, शरीराला विषबाधक आहे हे पालकांना पटवून दिले,तसेंच  पालकांनी   विद्यार्थ्यांच्या आहाराचे नियोजन करावे असे अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. महादेव क्षीरसागर  यांनी कोणतेही शिक्षण उच्च नीच दर्जाचे नसते,शिक्षण हे सर्वांसाठी सारखेच असते, विद्यार्थी हे समाजातील  हिरे असतात त्यांना पैलू पाडायचे काम तुम्ही आम्ही मिळून करायचे असते जो हिरा आहे तो कुठंतरी चमकतोच,
गुन्हेगारी पासून रोखण्याची खरी ताकद शिक्षणातच आहे. आपली मुले व आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे, मुख्याध्यापक  महादेव क्षीरसागर यांनी पालकांना उत्कृष्ट मार्गदर्शन  केले.
तसेच मुलांची सुरक्षितता या विषयावर सौ मीनाक्षी शिर्के व सखी सावित्री समिती यावर सौ. सुलक्षणा पाटील यांनीही  आपले मनोगत व्यक्त केले.
   संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. रुपाली गुजराथी  यांनी केले उपस्थीत मान्यवरांचे  श्री चौरे सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.ह्या कार्यक्रमात पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post