नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील पतंजली योग समिती नवापूर अंतर्गत तालुक्यातील योग शिक्षकांचा सन्मान स्व. प्रताप पाटील हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर आर देसले शिक्षण विस्तार अधिकारी,त्याचबरोबर डॉक्टर सुनील पाटील तसेच प्राचार्य चंद्रकांत शेटे होते या कार्यक्रमात 21 जून रोजी तालुक्यात ठीक ठिकाणी शाळांमध्ये योगाचे विद्यार्थ्यांसाठी घेतलेले योग संचलन "वसुदैव कुटुंबकम" या स्लोगन खाली यशस्वीरित्या योग शिबिर संपन्न केलेत
पुरस्कारार्थी:- डॉक्टर चेतन घरटे पी एस कुवर, रवींद्रनाथ महिरे गणेश महाजन मनोज पगारे राजधर पंडित जाधव , अमरवाडेरा महेश पाटील (मुख्याध्यापक) श्रीमती माधुरी अर्जुन चित्ते, श्रीमती मनीषा भदाणे श्रीमती योगिता भगवान पाटील श्री मनोज पाटील( मुख्याध्यापक) श्रीमती कुंदा अरविंद गावित श्रीमती माधुरी देविदास शिंपी श्री अनिल पेंढारकर व नाडीतज्ज्ञ तथा वैद्य ज्ञानेश्वर पुराणिक सर या या सर्वांचे प्रशस्तीपत्र त्याचबरोबर गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी नियमित योग वर्ग असणारे सगळे योग साधक काही महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते त्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिसले साहेब यांनी योगाचे महत्त्व,योगाची गरज व योगाचा स्व अनुभव याविषयी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय शेटे सर यांनी केले व यशस्वीतेसाठी सर्व पतंजली योग समितीचे सदस्य योग परिवार यांनी सहकार्य केले. यशस्वी कार्यक्रमाबद्दल जिल्हा पतंजली योग समिती तसेच भारत स्वायमान संघटन येथील पदाधिकारी आदरणीय माळी सर नवनीतजी शिंदे, अजय सिंग गिरासे यांनी कार्यक्रमाच्या साठीच्या शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले
Tags:
आरोग्य