यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राचा क्रीडा मोहत्सव दिनाक ६/१०/२०२४ रोजी KTHM कॉलेज नाशिक येथे संपन्न झाला. हया स्पर्धेत अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या पाच जिल्हातील विद्यार्थांसाठी मैदानी व सांधिक स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.( लांब उडी / उंच उडी / १००मिटर धावणे / कबड्डी हॉलीबॉल /खो-खो ) सदर स्पर्धेत नवापूर अभ्यास केंद्रातील एकूण २३ विधार्थानी सहभाग नोंदवला होता. खालील विद्यार्थ्यांची विदयापीठ स्तरावर निवड झाली.खो-खो - वसावे पिकेश रंजीत,
गावीत तुषार विष्णू, गावीत रोषण सुभाष,
गावीत हर्षल अनिल, गावीत समीर योना,
गावीत आकाश सुरेश,
लांब उडीत- गावीत गुलाबसिंग करणसिंग,
उंच उडीत/१००मिटर धावणे- दाभाडे महेश राजेश,कबड्डी - गावीत हर्षल अनिल
हॉलीबॉल - वसावे यशराज नितीन
वरील सर्व विद्यार्थ्यांची विदयापीठ स्तरावर निवड झाल्याबद्दल आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष विद्यमान आमदार मा.श्री शिरीषकुमार नाईक व इतर पदाधिकारी तसेच महविद्यालयाचे प्राचार्यसो (केंद्र प्रमुख ) डॉ. ए जी जायसवाल महाविद्यालयाचे उपप्राचार्य (केंद्र संयोजक) श्री.वाय.जी.भदाणे
केंद्र सहायक - श्री.अभय पाटील
क्रीडा शिक्षक प्रा. व्ही.एस.पाटील व श्री.मिलिंद पाटील कु. मीना शहा व श्री.सुजय गावित यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Tags:
क्रीडा