कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे
यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांना "सोलर पॅनलचे" वाटप महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या हस्ते केले. त्या दरम्यान खालील विषयांवर चर्चा केली
1) अनेक दिवसापासून पाठपुरावा करीत असलेल्या टप्पा अनुदानाचा विषय उद्या कॅबिनेटमध्ये मंजूर झालाच पाहिजे व ज्यांना अजून अनुदान मिळाले नाही त्यांचाही कॅबिनेटमध्ये सुटावा*
2) एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षक शिक्षकेतरना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी अहवाल प्राप्त झालेला आहे, सदर अहवाल उद्याच्या बैठकीत घेऊन, पेन्शन लागू करण्यासाठी निर्णय घ्यावा
3) डोंगरी भागासाठी 15 विद्यार्थी संख्या, अल्पसंख्यांक शाळांसाठी 20 संख्या, माध्यमिक शाळांसाठी 100 पटसंख्याला मुख्याध्यापक पद मंजुरीचा आदेश तात्काळ निघावा
4) समग्र शिक्षा अभियानातील 2905 कर्मचाऱ्यांच्या पद निर्मितीचा प्रश्न सोडवावा
आणि निवेदनाद्वारे या अगोदर ज्या ज्या मागण्या केल्या आहेत, त्या आचारसंहितेपूर्वी सोडवा अशी विनंती केली
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर शिक्षक शिक्षकांचा साठी अहोरात्र मेहनत करत आहेत. दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार फंडातून सुमारे 10 कोटी रुपयांचे ई लर्निंग चे साहित्य कोकणातील 2 हजार शाळांना वाटप केले, तसेच जिल्हा नियोजन फंडातून 2 कोटी रुपयांचे शाळांसाठी मंजूर करून सोलर हायब्रीड पॅनलचे वाटप केले त्याबद्दल शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी आमदार ज्ञानेश्वर मात्रे सरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
Tags:
शैक्षणिक