येथील उपजिल्हा रुग्णालयात येत्या पंधरा दिवसांत अद्ययावत असे डायलिसिस सेंटर एचएलएल कंपनीमार्फत सुरू करण्यात येणार असून, आठ मशिनरीद्वारे डायलिसिस सुरू झाल्यावर अनेक रुग्णांना तालुकास्तरावर सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे बाहेरगावी जाण्याची धावपळ थांबणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल गावित यांनी दिली.
नवापूर उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने अपघातग्रस्त व इतर रुग्णांची संख्या मोठी असते. रुग्णालयात रोज तीनशे ते साडे तीनशे बाह्य रुग्ण व चाळीस ते पंचेचाळीस दाखल रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळत असते. नुकतेच ट्रामा केअर सेंटर सुरू झाले आहे. त्यात इतर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत मात्र अस्थी रोग तज्ज्ञांचआवश्यकता आहे.त्याबाबत पाठपुरावा सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावित यांनी दिली.
पन्नास बेडची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालयात आहेत. ट्रामा केअरमध्ये वीस बेडस सुविधा उपलब्ध आहे. परिसरात स्वच्छता आहे.उपजिल्हा रुग्णालयामार्फत फिरते वैद्यकीय एक पथक (आश्रम शाळा), शालेय आरोग्य वैद्यकीय पथक कार्यरत आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनचे काही वैद्यकीय अधिकारीव वर्ग-चार कर्मचारी पद भरलेली असून, त्याद्वारे रुग्णसेवा कार्यास मदत मिळते, असे ते म्हणाले.
स्टाफची संख्या पुरेशी
येथील उपजिल्हा रुग्णालयात कायम कर्मचारी आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारे कंत्राटी पद्धतीने नेमणुका झालेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळतात. रुग्णांची दोन स्त्रीरोग, दोन बालरोग, एक भुल तज्ज्ञ आहेत. सहा वैद्यकीय अधिकारी, एक आयुष्य अधिकारी आहेत. एक एनसीडी अधिकारी आहे.
शस्त्रक्रियागृह सुरू
या वर्षभरात गर्भपेशीचे व नियमित स्त्री बाळंतपण शस्त्रक्रिया सत्तर ते ऐंशी झाल्या आहेत. दोन अद्ययावत शस्त्रक्रीया गृह आहेत. १०४ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते झाल्या आहेत. रुग्णालयात प्रसूती, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया होतात. शवविच्छेदन गृहाची अवस्था चांगली असून, शवविच्छेदन गृहासाठी अद्ययावत साहित्य नुकतेच उपलब्ध झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाहीत. दोन एक्स रे, एक सोनोग्राफी, आयसीयू विभाग अद्यावत होणार असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले.
त्याबाबत पाठपुरावा सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावित यांनी दिली. पन्नास बेडची व्यवस्था उपजिल्हा रुग्णालयात आहेत. ट्रामा केअरमध्ये वीस बेडस सुविधा उपलब्ध आहे. परिसरात स्वच्छता आहे.उपजिल्हा रुग्णालयामार्फत फिरते वैद्यकीय एक पथक (आश्रम शाळा), शालेय आरोग्य वैद्यकीय पथक कार्यरत आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनचे काही वैद्यकीय अधिकारीव वर्ग-चार कर्मचारी पद भरलेली असून, त्याद्वारे रुग्णसेवा कार्यास मदत मिळते, असे ते म्हणाले.
स्टाफची संख्या पुरेशी येथील उपजिल्हा रुग्णालयात कायम कर्मचारी आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनद्वारे कंत्राटी पद्धतीने नेमणुका झालेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळतात. रुग्णांची दोन स्त्रीरोग, दोन बालरोग, एक भुल तज्ज्ञ आहेत. सहा वैद्यकीय अधिकारी, एक आयुष्य अधिकारी आहेत. एक एनसीडी अधिकारी आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यासाठी २४ तास वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी एक्स्प्रेस फिडरची गरज असून, त्याबाबत वरिष्ठांकडे व महावितरणकडे मागणी केली हेळसांड होत नाही. रुग्णालयात उपचारासाठी आवश्यक सोयी-सुविधा व उपकरणे आहेत.
- डॉ. अनिल गावीत वैद्यकीय, अधिक्षक वर्ग 1
रुग्णांची धावपळ होणार नाही
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर होणार हे अत्यंत महत्त्वाचे असुन आता डायलिसिस साठि नवापूरवाशियांना धावपळ करावी लागणार आहे नवापूर रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन उपक्रम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वापरली जात आहेत अत्यंत आनंदाची बाब आहे या साठी वैद्यकीय अधीक्षक व सर्व कर्मचारी वर्गाचे खूप खूप धन्यवाद...
- भानुदास रामोळे ,राज्य आदर्श शिक्षक
Tags:
आरोग्य
अत्यावश्यक सेवा नवापूर रुग्णालयात मिळणार असल्याने उपचारासाठी आता बाहेरगावी जाण्याचा त्रास कमी होईल, धन्यवाद 🌹🙏🌹
ReplyDelete