नवापूर सत्यप्रकाश न्युज
तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आव्हान करण्यात येते की म श्री सावन कुमार साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व म राहुल गावडे प्रकल्प संचालक यांच्या प्रयत्नाने 14727 एवढे खूप मोठे उद्दीष्टप्राप्त झालेले आहे प्रधानमंत्री आवास योजना ड यादीतील सर्व लाभार्थी यांना घरकूल मंजूर करण्यात आलेले आहेत तरी सर्व लाभार्थीयांनी आपले कागदपत्र आधार कार्ड जॉब कार्ड बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे पंचायत समिती नवापूर किंवा आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे दोन दिवसात जमा करावे आपल्या तालुक्यासाठी शंभर टक्के ड यादीतील लाभार्थ्यांसाठी घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे त्यासाठी कोणतेही शुल्क फी लागत नाही कोणालाही पैसे देवु नये ही विनंती तसेच आपणांस पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतघरकुलाचे काम सुरु झाल्या नंतर मस्टर रोजगार सेवक यांचें मार्फत मागणी करावी घरकुलाचे काम झाल्या नंतर मस्टर मागणी केल्यास मस्टर निघत नाहीत त्यामुळे पाया पूर्ण झाल्या नंतर, लेंतल लेव्हल, छत टाकल्या नंतर सोबतच मस्टर काढावे जेणे करुन आपले नरेगा अंतर्गत मजुरीचे नुकसान होणार नाहीत घरातील 5 सदस्यांचे हजेरी पत्रक काढावे कुटुंबात 5 सदस्य नसल्यास घरकुल बांधकामासाठी जे जॉब कार्ड धारक मजुर असतील त्यांचे नावाने मस्टर काढावे व 100 दिवसांच्या आत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून आपल्या स्वप्नातील घरकुलाचा आनंद घ्यावा यामुळे म. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 100 दिवस कार्यक्रमाची ( फल निष्पत्ती पूर्ण होईल) पूर्ण होईल अशी माहिती नवापूर गटविकास अधिकारी पंचायत समिती देवीदास देवरे यांनी दिली आहे.
Tags:
शासकीय