५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

ठाणे सत्यप्रकाश न्युज 
   आज जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन  हे न्यू इंग्लिश स्कूल, ठाणे येथे पार पाडले. यावेळी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार  ज्ञानेश्वर म्हात्रे  यांनी, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांचे  कौतुक केले व पारितोषिक वितरण केले. तसेच विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करून  विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
     यावेळी कार्यक्रमाला पदवीधर मतदार संघाचे आ.निरंजन डावखरे साहेब ,जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. ललिता दहितुले  , तसेच उपशिक्षणाधिकारी ठाणे जिल्हा परिषद श्री.मोहिते साहेब व शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी व न्यू इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष श्री.व्यास मूर्ती  शिक्षक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post