धार्मिक ग्रंथांचे वाचन करा जेणेकरून आपल्या सोबत इतरांचे जीवन सार्थक होईल - डॉ गौतम खट्टर

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     आपण सर्वांनी हिंदू धर्मातील ग्रंथांचे वाचन करायला हवे जेणेकरून आपल्या धर्माची व आपल्या संस्कृतीचे ज्ञान प्राप्त होईल व आपल्या सोबत इतरांचे देखील कल्याण होईल असे विचार नवापूर येथे आयोजित सकल हिंदू समाजातर्फे आयोजित हिंदू मेळाव्यात सनातन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गौतम खट्टर यांनी मांडले.
   ते पुढे म्हणाले की हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ रामायण, महाभारत,भगवत गीता सारखे अनेक ग्रंथ असून त्यांचे वाचन लहानपणापासून केले पाहिजे, ती अंगीकृत केली तरच धर्म वाचेल आणि टिकेल. सनातन संस्कृती वाचवायची असेल तर भगवत गीतासोबत वेदांचे, उपनिषेधांचे धार्मिक ग्रंथांचे वाचन करा आणि इतरांनाही सांगा. त्याने स्वतः बरोबर इतरांच्या ही जीवनाचे सार्थक होईल असे परखड मत हिंदू मेळाव्याचे वक्ते राष्ट्रीय सनातन महासंघाचे अध्यक्ष मेळावाचे वक्ते डॉ. गौतम खट्टर यांनी व्यक्त केले.
    हिंदू संस्कार मेळावा आयोजन समिती तर्फे नवापूर शहरातील श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर भव्य हिंदू मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात हिंदू धर्मात चुकीच्या पद्धतीने रुजविण्यात आलेल्या रुढीपरंपरा, चालीरीती मुळे सनातन धर्माचे कसे नुकसान झाले यावर डॉ गौतम खट्टर यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेने सायंकाळी पाचला करण्यात आली. शोभायात्रेत ढोल ताशाचा गजरात आदिवासी झिबली नृत्य सादर करत समारोप मेळाव्याच्या ठिकाणी झाली. कार्यक्रमाची सुरुवाता देवमोगरा माताची प्रतिमापुजन करुन दिप प्रज्वलन करुन करण्यात आले या प्रसंगी समिती अध्यक्ष मनोज अग्रवाल यांनी डॉ गौतम खट्टर यांचे स्वागत केले. श्री खट्टर पुढे म्हणाले की, घराघरात मर्यादा पुरुषोत्तम रामाची प्रतिमा, भगवत गीता सोबत धार्मिक ग्रंथ असले पाहिजे त्याचे सामूहिक वाचन केले पाहिजे. सनातन धर्मात जातीय व्यवस्था नव्हती, ही काही समाजकंटकानी रुजवली, वास्तविक सनातन एक आहे. आपसातील भेदभाव नष्ट करा, व्यापार वाचवा. असे ते म्हणण आयोजन समितीने केले होते. भव्य हिंदू संस्कार मेळाव्यात नवापूर शहरासाह तालुक्यांतील मोठ्या संख्येने जनसागर उपस्थित होता.
यांनी डॉ गौतम खट्टर यांचे स्वागत केले. श्री खट्टर पुढे म्हणाले की, घराघरात मर्यादा पुरूषोत्तम रामाची प्रतिमा, भगवत गीता सोबत धार्मिक ग्रंथ असले पाहिजे त्याचे सामूहिक वाचन केले पाहिजे. सनातन धर्मात जातीय व्यवस्था नव्हती, ही काही समाजकंटकानी रुजवली, वास्तविक सनातन एक आहे. आपसातील भेदभाव नष्ट करा, व्यापार वाचवा. असे ते म्हणाले हिंदू संस्कार मेळावा आयोजन समितीने केले होते.
   भव्य हिंदू संस्कार मेळाव्यात नवापूर शहरासाह तालुक्यातुन गाव पाड्यांवरून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मेळाव्याची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, उपाध्यक्ष राजेंद्र गावीत, अनिल वळवी, गोपी सैन, शंकर दर्जी व नवापूर शहरात भव्य हिंदू मेळावा हिंदू संस्कार मेळावा आयोजन समिती पदधिकारी यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन कमलेश पाटील यांनी केले, तर आभार गोपी सेन यांनी मानले. कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,उपनिरीक्षक विशाल सोमवणे, जितेंद्र महाजन, भाऊसाहेब लांडगे व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

1 Comments

Previous Post Next Post