जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी व शिक्षकांचे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेतर्फे काल दि.22, रोजी शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्हा परिषद येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रविण अहिरे साहेब व शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री रोकडे साहेब यांच्या दालनात श्री पठाण साहेब व शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षक तक्रार निवारण सभा घेण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांच्या विविध तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण करण्यात आले. तसेच यावेळी जिल्हा परिषद प्रायमरी व माध्यमिक चे पगार हे एक ते पाच तारखेत होतात का ते करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली यावर शिक्षणाधिकारी साहेबांनी सांगितले की हो आमचे एक ते पाच तारखेपर्यंत पगार होतात, दुसरा विषय किती शाळांच्या संच मान्यता त्रुटींमध्ये आहेत त्यांची शिफारस वर पुण्याला करण्यात आलेली आहे व असेल तर आम्ही पुण्यात पाठपुरावा करून ते काम करून घेतो, त्यावर त्यांनी संच मान्यता दुरुस्ती संदर्भात शाळांचा आकडा सांगितला, त्याप्रमाणे पुण्यात पाठपुरावा करण्यात येईल. तसेच अंशतः अनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा पुढील टप्पा अनुदान आल्यावर तो त्वरित टाकण्यात यावा त्यावर शिक्षणाधिकारी यांनी सांगितले की पैसे आले की लगेच पुढील टप्पा टाकु , त्या नंतर कोणाचे शालार्थ आयडी , वैयक्तिक मान्यता बाकी असतील तर तेही तात्काळ देण्यात यावे व जिल्ह्यात कुठे अतिरिक्त शिक्षक असतील तर त्यांची समायोजन करण्यात यावी अशा अनेक प्रश्नांवर या वेळी चर्चा करण्यात आली व शिक्षकांच्या समस्या दूर करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाभरातून अनेक संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते तसेच यावेळी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेचे नंदुरबार जिल्हा पदाधिकारी जिल्हा कार्याध्यक्ष नितीन धनगर, महिला आघाडी अध्यक्ष अपेक्षा चव्हाण मॅडम, मोहन अहिरे सर, धडगाव तालुका अध्यक्ष जे डी वसावे सर, संस्थाचालक धर्मराज पाडवी, देवबा पाडवी, राठोड सर आदि पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीचे शेवटी नितीन धनगर सर यांनी आभार मानले.
Tags:
शैक्षणिक